महाराष्ट्रात काही ठिकाणी आज पावसाने हजेरी लावली आहे, त्यामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे, मात्र तरी देखील राज्यातील अनेक भागांमध्ये अजूनही उष्णतेची लाट कायम आहे.
आज राज्यातील काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे, पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला, त्यामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे, मात्र दुसरीकडे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अजूनही उष्णतेची लाट कायम आहे. शुक्रवार आणि शनिवार असा दोन दिवस हवामान विभागाकडून विदर्भातील 3 जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. अकोला, अमरावती आणि वर्धा या तीन जिल्ह्यांना उष्णतेचा रेड अलर्ट देण्यात आला आहे, तर इतर जिल्ह्यांना उष्णतेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरीमध्ये काल तब्बल 47. 1 अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली आहे. गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात उष्माघातामुळे दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
